

कोल्हापूर - करून त्यांना मोकांतर्गत कारवाईची धमकी देत १२ लाखांची खंडणी वसुली केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद शाहू संदीप पोवार (वय १९, रा. सानेगुरुजी वसाहत) यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.
एलसीबीचे पोलिस असल्याचे भासवून आठ जणांचे कृत्य
योगेश शंकरराव पाटोळे (३२, मेढे पार्क, शिंगणापूर पाण्याच्या टाकीसमोर), ताहीर शब्बीर मगदूम (३०, रा. हेर्ले, हातकणंगले), नोमान दिलावर शेख (१९, रा. टेंबलाईनाका), सूरज सुनील भोसले (२४, रा. हेर्ले, ता. हातकणंगले), गजानन सचिन थोरवत (३०, रा. सानेगुरूजी वसाहत) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. यासह त्याच्या तिघा अनोळखी साथिदारावर गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, शाहू पोवार हा सानेगुरुजी वसाहत येथे राहतो. तो सध्या शिक्षण घेत आहे. ४ डिसेंबर २०१९ दिवशी दुपारी सव्वा १२ सुमारास त्याचा मित्र विश्वजित इनामदार हा गांधी मैदान परिसरात उभा होता. त्यावेळी अलिशान मोटीरीतून आलेल्या चौघा अज्ञातांनी त्याचे अपहरण केले. त्याच्याकडे शाहू पोवार याच्या घरच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्याला शाहूला गोड बोलवून घेऊन येण्याच्या अटीवर सोडून दिले. दुसऱ्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास शाहू त्याचे मित्र विश्वजित, प्रवीण आणि गजानन हे सायबर चौकात गेले होते. त्यावेळी तेथे दोन अलिशान मोटारीतून आठ जण आले. त्या सर्वांनी त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस (एलसीबी) असल्याचे सांगून त्या चौघांना गाडीत बसण्यास सांगितले. त्यानंतर त्या आठ जणांनी ‘शाहूला तुझ्याकडे भरपूर पैसे आहेत. तुझ्या वडिलांचे जेसीबी आहेत. तू आम्हाला ३४ लाख रूपये खंडणी द्यायची, खंडणी दिली नाही तर तुला बलात्कार तसे लुटीच्या गुन्ह्यात अडकवून ‘मोकातंर्गत कारवाई करू’ पैसे नाही मिळाले तर जीवे मारू’ अशी धमकी दिली. त्यानंतर या अपहरणकर्त्यांनी त्यांना मोरेवाडी चौकातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे घेऊन जातो असे सांगितले. त्याना मिलिटरी कॅम्प, उड्डाणपूल, लोणार वसाहत, मार्केट यार्ड, कदमवाडी, कसबा बावडा मार्गे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या चौकात घेऊन गेले. तेथे शाहू हे घाबरले. त्यांनी ऐवढे पैसे देऊ शकत नाही दोन लाख रूपये देतो असे सांगितले. त्यावरून अपहरणकर्त्यांनी ३४ लाखांवरून २५, १५ अखेर शेवटी १२ लाखांवर तडजोड केली. त्याच दिवशी शाहू पोवार यांच्याकडून त्या आठ जणांना सायंकाळी सातच्या सुमारास धैर्यप्रसाद चौकात ५ लाख ४० हजार ६ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी कसबा बावडा रस्त्यावर ६ लाख ६० हजार रूपये अशी एकूण १२ लाख रूपयांची खंडणी वसूल केली.
अपेक्षित खंडणीची वसुली केल्यानंतरही संबधित अपहरणकर्त्यांनी ५ जानेवारी. १० जानेवारी आणि १७ फेब्रुवारीला सकाळी शाहू पोवार याला फोनवरून संपर्क साधला. त्याला केदार पार्क सानेगुरूजी वसाहत येथे येऊन आणखी सहा लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली. ती खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार पोवार यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार संशयित योगेश पाटोळे, ताहीर मगदूम, नोमान शेख, सूरज भोसले, गजानन थोरवतसह त्याच्या तिघा साथिदार अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पहिल्या पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात पाळत ठेवण्यासाठी वापरलेली मोपेड जप्त केली. याबाबत पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने तपास करीत आहेत.
अन्य साथीदारांचा शोध सुरू
अपहरणकर्त्यांनी फिर्यादीसह त्याच्या मित्रांचे एलसीबीचे पोलिस असल्याचे सांगून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना एलसीबी कार्यालयासमोरील व पाठीमागील रस्त्यावर नेऊन दबाव टाकला. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून मोकांतर्गत कारवाई करतो, अशी धमकी दिली. यातील एकाला अधिकारी असल्याचेही त्यांनी भासवल्याचे तपासात पुढे येत आहे. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून याचा पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.